Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रशिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।। छ....

शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।। छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!




Shiv Jayanti 2022 : महाराष्ट्रातील पहिल्या शिवजयंतीबद्दल तुम्हाला माहीत आहे का? मग जाणून घ्या कधी आणि कोणी केली सुरुवात

हिंदवी स्वराज्याची स्थापना करत मराठा साम्राज्याचा (Maratha empire) विस्तार करणारे छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) शौर्याचे प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम (Covid 19 ) पाळत हे कार्यक्रम पार पडणार आहेत. दरवर्षी मोठ्या आतुरतेने शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीची वाट पाहत असतात. शिवजयंतीनिमित्ताने आम्ही तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला सांगणार आहोत की, सार्वजनिक स्वरूपात पहिली शिवजयंती कधी साजरी झाली? ही शिवजयंती कोणी आणि कुठे साजरी केली होती? ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. चला तर मग जाणून घेऊ याबद्दल.

पुण्यात साजरी झाली पहिली शिवजयंती…

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पहचावा यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा सन 1870 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. शिवजयंतीचा हा कार्यक्रम पुण्यात पार पडला होता. तत्पूर्वी 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनावर त्यांनी पहिला पोवाडा रचला.

शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहचावी यासाठी शिवजयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी होत आहे. इंग्रजांच्या विरोधात लढा उभारताना देखील शिवजयंती अधोरेखित झाली. यावेळी लोकमान्य टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करत स्वतंत्र चळवळ मजबूत केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील शिवजयंती साजरी केली ते शिवजयंती कार्यक्रमाचे 2 वेळेस अध्यक्ष होते. त्यानुसार महात्मा फुले यांनी सुरु केलेली शिवजयंती फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देश-विदेशात देखील साजरी केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारकडून शिवनेरीवर साजरा होतो शिवजन्मोत्सव…

शिवजयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी होत विविध कार्यक्रम पार पडतात. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्याची रीत आहे. महाराष्ट्र सरकारकडून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी पाळणा, पोवाडे गाऊन शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यासह किल्ल्यावर विविध शिवप्रेरणा स्थळावरून शिवज्योत आणण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -