मतदारांचा घोळ निवडणूक आयोग कसा मिटवणार, पालिका निवडणुकीत तोडगा मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून आलेली आहे. त्यातील एकही नाव डिलीट करण्याचे अधिकारी राज्य आयोगाला नाही, फक्त नाव दुसऱ्या प्रभागात गेल असेल तर दुसरुस्ती करता येईल. दुबार मतदान संदर्भात जी प्रक्रिया आहे, घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे. त्यांना विचारलं आहे की तुम्ही कुठे मतदान करणार, त्याव्यतिरिक्त त्याला दुसरीकडे मतदान करता येणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले आहे.
निवडणूक अधिकारी म्हणून २९० निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर ८७० सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. ४८ तास आधी प्रचारावर निर्बंध असणार आहे. आजपासून सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता सुरू करण्यात आली आहे.
पालिकांच्या निवडणुकींसाठी मतदान 15 जानेवारीला, 16ला मतमोजणी
पालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज करण्याची तारखी 23 डिसेंबर आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार. 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईन घेण्यात येणार
राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. जात वैधता पडताळणीसाठी राखीव जागेवर लढणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार. सत्यप्रत वा अन्य पुरावा द्यावा. त्यानंतर सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र देण्याचं हमी पत्र द्यावी लागेल. नाही दिलं तर निवड रद्द होईल.
मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत
राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्याबाबत कार्यवाही केली आहे असेही सांगण्यात आले आहे. राज्यातील २९ महापालिकेबाबतची पत्रकार परिषद आहे. २७ची मुदत संपली आहे. जालना आणि इचलकरंजी या नवीन महापालिका आहेत, त्यांचीही निवडणूक होणार आहे.
29 महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहिर होणार
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु आहे. त्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहिर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.





