राज्यातील थंडीची लाट ओसरली आहे. मात्र थंडीचा कडाका राज्यात कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील थंडी काहीशी अधिक आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.राज्यातील बहुतांशी भागात थंडीची लाट ओसरली आहे. मागील ४ दिवस काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट होती. परंतु कालपासून थंडीटी लाट नाही. पण राज्यात थंडीचा कडाका कायम आहे.
बहुतांशी भागात किमान तापमान १० ते १२ अंशाच्या दरम्यान आहे. आज जेऊर येथे राज्यातील निचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.१ अंशाची नोंद झाली होती. तर अहिल्यानगर आणि मोहोळ येथे ८.३ अंशाची नोंद झाली होती.
नाशिक आणि मालेगाव तसेच गोंदीया आणि यवतमाळ येथे किमान तापमान १० अंशांपेक्षा कमी होते. विदर्भातील सर्वच भागात सरासरी किमान तापमान १० ते १२ अंशाच्या दरम्यान होते.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडी कायम आहे. तर कोकणातील काही ठिकाणी तापमान काहीसे अधिक होते. रत्नागिरी येथे ३४ अंश तापमानाची नोंद झाली होती. राज्यात थंडीचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.






