ताजी बातमी ऑनलाइन टीम
Fire-Boltt Ninja ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केलं आहे आणि ते एक स्वस्त सेगमेंटमधलं स्मार्टवॉच आहे. यामध्ये, कंपनीने अनेक शानदार फीचर्स सादर केले आहेत, ज्यात अधिक बॅटरी बॅकअप आणि ब्लूटूथ कॉलिंग सारखे फीचर्स आहेत.
Fire-Boltt Ninja ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच स्क्वेरिश डिझाइनमध्ये येते आणि त्याची किंमत 2999 रुपये आहे. कंपनीने हे व्हाइट, ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड या चार कलर व्हेरियंटमध्ये सादर केले आहे.
या स्मार्टवॉचची पहिली विक्री 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता Amazon वर सुरू होईल. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 240 x 280 पिक्सेल आहे. यात उजव्या बाजूला रोटेटेबल क्राउन आहे, जो वॉच नेव्हिगेट करण्यात मदत करतो.
यात बिल्ट इन मायक्रोफोन आणि ब्लूटूथ कॉलिंगसाठी स्पीकर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या वॉचमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे कॉल रिसीव्ह केले जाऊ शकतात. याशिवाय कॉन्टॅक्ट्स, क्विक डायल पॅड आणि कॉल हिस्ट्री इत्यादी गोष्टी यामध्ये पाहता येतील. यात म्यूटचा पर्यायही आहे.
या स्मार्टवॉचमध्ये 30 विविध स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत, ज्यामध्ये वॉकिंग, रनिंग आणि सायकलिंग असे पर्याय देण्यात आले आहेत. यात SpO2 सेन्सर देखील मिळेल, जो ऑक्सिजन मॉनिटरिंगचे फीचर प्रदान करेल. विशेष म्हणजे यात इनबिल्ट गेम्सही आहेत.