Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : जम्पिंग मशिनवरील उडी जीवघेणी; सातव्या मजल्यावरुन पडून बालकाचा मृत्यू

धक्कादायक : जम्पिंग मशिनवरील उडी जीवघेणी; सातव्या मजल्यावरुन पडून बालकाचा मृत्यू

सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे एका लहान बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशीनवर खेळत असताना हा अपघात झाला. बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन पडल्याने 13 वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले. ही घटना नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मध्ये  उघडकीस आली आहे. ईशान गुप्ता असं या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र उंच इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिन का ठेवण्यात आली होती, ती ऑपरेट करण्यासाठी कोणी वयस्क व्यक्ती का नव्हती, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सोमवारी रात्री ईशान हा आपल्या इमारतीच्या टेरेसवर खेळण्यासाठी गेला होता. यावेळी टेरेसवर इमारतीतील दोघे व्यक्ती वॉकिंगही करत होते. तर ईशान हा टेरेसवर ठेवलेल्या जम्पिंग मशिनवर एकटाच खेळत होता.

यावेळी ईशान याने जम्पिंग मशिनवरुन उडी घेतली, मात्र त्याला स्वतःचा तोल सांभाळता न आल्याने, तो टेरेस वरुन खाली पडून गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत ईशानला तात्काळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

उंच इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिन का ठेवण्यात आली होती, ती ऑपरेट करण्यासाठी कोणी वयस्क व्यक्ती का नव्हती, ही हलगर्जी कोणी बाळगली, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -