Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर सत्ताधारी ‘मविआ’चे आंदोलन सुरू;

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर सत्ताधारी ‘मविआ’चे आंदोलन सुरू;

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ गुरुवारी सकाळी मंत्रालयाबाहेर सत्ताधारी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. सध्या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, सप्रिया सुळे आदी नेते दाखल झाले आहेत. शिवसेनेचे सुभाष देसाईही आंदोलन स्थळी आहेत. मात्र, दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे यूपी दौऱ्यावर गेल्यामुळे या आंदोलनात सहभागी नसल्याचे समजते. यापूर्वी विविध आरोपांमुळे शिवसेनेच्या संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. आता अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप असूनही मलिकांचा राजीनामा का नाही, असा सवाल विरोधकांनी केलाय.



मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ उद्यापासून महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा आज आंदोलनस्थळी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. मंत्री जयंत पाटील म्हणाले की, ज्या ठिकणी केंद्राला विरोध केला जातो तिथे अशी परिस्थिती आहे. नवाब मलिकांवर केलेले आरोप चुकीच आहेत. जागा खरेदी केली म्हणून त्यांना आत टाकणे हे अत्यंत चुकीचे आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. नवाब मलिक यावर सविस्तर उत्तर देतील. त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -