पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी रॅक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीसह एकूण 3 जणांची पोलिसांनी वेश्या व्यवसातून सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या अभिनेत्रीकडून लॉजवर वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 दलालांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर तेथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या ताथवडेमधील साई लॉजवर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला.
पोलिसांनी पाठवलेल्या डमी ग्राहकाने दिलेल्या सूचनेचं पालण केलं. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी लॉजवर धाड टाकली आणि या सेक्स रॅकेटचा प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांविरुद्ध पोलिसांनी वाकड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी ग्राहकांना व्हॉट्सअप कॉल करायचा आणि ठरल्याप्रमाणे लॉजवर मुली पाठवायचा आणि संबंधीत मुलगी लॉजवर आपल्या नावाने रुम बुक करायची. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे सुरु होता. मात्र पोलिसांनी हे रॅकेट उघड केले. या वेश्या व्यवसायातून एका अभिनेत्रीसह तिघींची सुटका करण्यात आली. सुटका केलेली अभिनेत्री छत्तीसगढमधील असल्याची माहिती समोर आली आहे.