Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहाशिवरात्री यात्रा अखेरची ठरली, मित्राला सोडून परतताना बाईक झाडावर आदळली, तरुणाचा जागीच...

महाशिवरात्री यात्रा अखेरची ठरली, मित्राला सोडून परतताना बाईक झाडावर आदळली, तरुणाचा जागीच अंत

महाशिवरात्री निमित्त यात्रेला  निघालेल्या तरुणाचा अपघातात दुर्देवी अंत झाला. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. रस्त्यालगत असलेल्या चिंचेच्या झाडावर तरुणाची बाईक धडकली. यामध्ये जागीच तरुणाला प्राण गमवावे लागले. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील इसापूर गुरढा मार्गावर घडली आहे. दिनेश रोशन बोरकर असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 22 वर्षांचा होता. दिनेश भंडाऱ्यातील जेवनाळा इथला रहिवासी होता. वाटेत भेटलेल्या मित्रांना सोडण्यासाठी तो इसापुरला गेला. मात्र परत आपल्या यात्रेच्या मार्गावर लागला असता त्याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटून अपघात झाला.

चार दिवसांपूर्वीच पुण्याहून तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची अप्रेंटिस करुन दिनेश गावात परतला होता. सकाळी महादेवाच्या यात्रेला जात आहे, असं सांगत तो घरुन निघाला होता. वाटेत भेटलेल्या मित्रांना सोडण्यासाठी तो इसापुरला गेला.

दरम्यान परत आपल्या यात्रेच्या मार्गावर लागला असता त्याचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या चिंचेच्या झाडावर त्याच्या बाईकची धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की त्यात जागीच दिनेशचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पालांदुर पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठत त्याचा मृतदेह पंचनामा करत शव विच्छेदनासाठी पाठवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -