Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगवेश्या व्यवसाय, गुलामगिरी आणि गुन्हेगारीचा वाढता धोका

वेश्या व्यवसाय, गुलामगिरी आणि गुन्हेगारीचा वाढता धोका

रशियाने पुकारलेल्‍या युद्धामुळे युक्रेनमधील परिस्थिती आता भीषण हाेत आहे. हजाराे नागरिक बेघर झाले आहेत. अन्न, पाणी नाही. देशातील मुलभूत सुविधा उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍या आहेत. या संधीचा फायदा काही गुन्हेगारी टोळ्या घेत आहेत. युक्रेनमधील निर्वासितांना तस्करांकडून लक्ष्य केले जाण्‍याचा धोका आहे, असा इशारा ‘चॅरिटी केअर’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेने दिला आहे.

यासंदर्भात ‘चॅरिटी केअर’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेने प्रसिद्‍ध केलेल्‍या अहवालात म्‍हटलं आहे की, युक्रेनमधील लाखाे नागरिक रोमानियामध्ये स्‍थलांतरीत झाले आहेत. त्‍यामुळे या देशावरील ताण वाढला आहे. सीमावर्ती देश निर्वासितांना स्वीकारण्यास तयार नाहीत. युद्ध सुरू होऊन ११ दिवस झाले आहेत आणि असा अंदाज आहे की आतापर्यंत १५ लाखांहून अधिक नागरिक युक्रेनमधून स्‍थलांतर केले आहे. गुन्हेगारी टोळ्यांकडून निर्वासित महिलांचे शाेषण सुरु असून त्‍यांना वेश्याव्यवसायास भाग पाडले जाण्‍याची शक्‍यता आहे. हतबल झालेल्‍या नागरिकांना गुलामगिरी ढकलेले जाण्‍याचीही भीती अहवालात व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे.

युक्रेनमधील नागरिक शेजारच्या पोलंड, माल्दिव्ह, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरीमध्ये आश्रय घेताना दिसत आहेत. याचा परिणाम मानवी तस्करीमध्ये झालेल्या वाढीमध्ये दिसून येत आहे. यामुळे यूरोपीयन संघामध्‍ये भीतीचे सावट पसरलेले आहे.

संपूर्ण युरोपवर परिणाम हाेण्‍याची भीती
चॅरिटी केअरच्या मानवी तस्करी धोरणतज्ज्ञ‍ लॉरेन एग्न्यू यांनी ‘डेलीमेल’ या वृत्तसंस्थेला माहितीनूसार, युक्रेनमधील युद्ध मानवी तस्करीच्या दृष्टिकोनातून गंभीर परिस्थिती निर्माण करेल. याचा परिणाम संपूर्ण युरोपवर होईल. निर्वासितांच्या शोषणाचा धोका वाढतच चालला आहे. लोक देश सोडून जात असताना, बहुतेक स्ञिया वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी आणि जबरदस्तीने गुलामगिरीत अडकण्याचा धोका संभावतो आहे, असेही त्‍यांनी अहवालात नमूद केले आहे.

सीमा ओलांडल्यानंतर महिलेकडे जबरदस्तीने पैसे मागितले
काही महिला आणि कुटुंबियांनी सीमा ओलांडून शेजारच्या देशात जण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. यासंबधीत घटनेबाबत एका २७ वर्षीय युक्रेनियन महिलेने सांगितले की, “माझी एक मैत्रीण पोलंडला गेली होती. तिने मला सांगितले की, ती ज्या व्यक्तीसोबत गेली होती त्याने तिला मोफत वर्सा येथे नेण्याचे वचन दिले होते; परंतु वर्सा येथे पोहोचल्‍यानंतर त्याने तिच्याकडे पैसे मागितले. तसेच तू आता कर्जदार आहेस. मी सांगेल ते काम करून तुला कर्ज परत करावे लागेल, असेही त्‍याने सांगितले. माझी मित्रीण ओरडू लागली आणि तेथून पळून गेली” असे सांगत या महिलेने सर्व लोकांना अशा परिस्थितींपासून सावध होण्याचा संदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -