Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमहिला दिनानिमित्त पत्नीला द्या खास गिफ्ट, या खास योजनेत गुंतवणूक करुन दरमहा...

महिला दिनानिमित्त पत्नीला द्या खास गिफ्ट, या खास योजनेत गुंतवणूक करुन दरमहा मिळतील 45 हजार रुपये!

8 मार्च म्हणजे उद्या संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिला दिनानिमत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महिलादिनामित्त आपण आपल्या आयुष्यात विशेष स्थान असलेल्या मग आई असो पत्नी, बहिणी, आजी, मैत्रीण असो किंवा इतर कोणी महिला त्यांना शुभेच्छा देतो आणि या खास दिवशी त्यांना विशेष वागणूक देतो. या खास दिनी महिलांचा आदर केला जातो आणि त्यांची काळजी घेतली जाते. पण ही काळजी फक्त एका दिवसासाठी मर्यादित न ठेवता तुम्ही महिला दिनानिमित्त त्यांना खास गिफ्ट देऊ शकता. आपल्या जवळच्या महिलेचे भवितव्य तुम्ही सुरक्षित करु शकता. या खास दिवशी तुम्ही तिला एक सरप्राईज देऊन गिफ्ट (Womens Days Special Gift) देऊन त्यांना दरमहा 45हजार रुपये मिळवून देऊ शकता.

या खास दिवशी तुम्ही तुमच्या पत्नीला, आईला किंवा बहिणीला असे गिफ्ट देऊ शकता जेणेकरून ती स्वावलंबी होईल. जर तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत पत्नीला कोणावर अवलंबून राहू नये असे वाटत असेल तर आम्ही सांगणार आहोत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. यामुळे तुमची पत्नी भविष्यात कोणावरही अवलंबून राहणार नाही. ते खास गिफ्ट म्हणजे तुम्ही पत्नीच्या नावावर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (National Pension Scheme) गुंतवणूक करु शकता.

पत्नीला महिला दिनाचे गिफ्ट म्हणून तुम्ही तिच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम (New pension system Account)अकाऊंट उघडू शकता. एनपीएस (NPS) अकाऊंट तुमच्या पत्नीला 60 वर्षांचे झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच तुमच्या पत्नीला दरमहा पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्नही मिळेल. एनपीएस अकाऊंटद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल हे देखील ठरवू शकता. पत्नीच्या नावावर हे पेन्शन अकाऊंट सुरु केल्यामुळे वयाच्या 60 वर्षांनंतर तुमची पत्नी पैशांसाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. तुम्ही नवीन पेन्शन सिस्टम अकाऊंटमध्ये तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक पैसे जमा करू शकता.

फक्त 1,000 रुपयांमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर एनपीएस अकाऊंट उघडू शकता. हे अकाऊंट वयाच्या 60व्या वर्षी मॅच्युअर होते. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही पत्नीचे वय 65 वर्षे होईपर्यंत एनआयपी अकाऊंट चालवू शकता. त्याचा तुमच्या पत्नीला जास्त फायदा होईल.

दरमहा 45 हजारांपर्यंत पेन्शन कशी मिळणार? –
एकूण गुंतवणुकीचा कालावधी – 30 वर्षे

मासिक योगदान – 5,000 रूपये

गुंतवणुकीवर अंदाजे परतावा – 10 टक्के

एकूण पेन्शन फंड – 1,11,98,471 रूपये

अॅन्युइटी योजना खरेदी करण्याची रक्कम – 44, 79,388 रूपये

अंदाजे वार्षिकी दर 8 टक्के – 67,19,083 रूपये

मासिक पेन्शन – 44,793 रूपये

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -