Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरज्योतिबा मंदिरातील ई दर्शन बंद करा : ग्रामस्थांची मागणी

ज्योतिबा मंदिरातील ई दर्शन बंद करा : ग्रामस्थांची मागणी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जोतिबा मंदिरातील चारही दरवाजे उघडून ई दर्शन बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जोतिबा डोंगर येथील समस्त ग्रामस्थ, पुजाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने कोल्हापूर जिल्हा निबंधमुक्त झाला आहे. त्यामुळे धार्मिकस्थळे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तरीही जोतिबा डोंगर येथे मंदिरात दर्शनासाठी भाविकांना ई पास बंधनकारक करून मंदिराचे चारही दरवाजे पूर्णपणे उघडलेले नाहीत .जोतिबाचे खेटे सुरु झाले असून रविवारी गर्दीत भर पडत आहे. तसेच उन्हाचा तडाखाही वाढत चालला आहे.




अशा स्थितीतही मंदिरातील ई-पाससह इतर निर्बंध न उठविल्याने तसेच दर्शन रांगेच्या नियोजनाअभावी भाविकांची गैरसोय होत आहे.जोतिबा डोंगर हे महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची गर्दीही असतेच, परंतु गेल्या दोन वर्षांत कोरानाच्या संसर्गामुळे याला मर्यादा आल्या आहेत. अलिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोल्हापूर जिल्हा निबंधमुक्त झाला आहे. त्यामुळे धार्मिकस्थळे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

परंतु जोतिबा डोंगर येथे अद्याप पूर्णपणे निर्बंध उठविले नसल्याचे चित्र आहे. जोतिबा दर्शनासाठी भाविकांना ई पासद्वारे सोमवार ते शनिवार पश्चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. येथे दर्शन घेतल्यानंतर उत्तर दरवाजा व दक्षिण दरवाज्यातून बाहेर सोडले जात धेकाऱ्यांकडे मागणी आहे. आता निर्बंध उठले तरी ई-पास सुविधा सुरु असल्याने रांगेत भाविकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे भाविक व देवस्थान समितीचे कर्मचारी तसेच पोलिसांबरोबर वादावादीचे प्रकार होत आहेत. खेट्यांमुळे गर्दीचे प्रमाण वाढले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -