तुम्ही पुण्यात राहात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणेकरांच्या खिशावर भर पडण्याची शक्यता आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने तिकिटांचे दर महागणार आहेत. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. पीएमपीची बस सेवा सध्या तोट्यात सुरु आहे. तोटा भरुन काढण्यासाठी तिकीटदरात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक म्हणजे मनपा ग्रामीण भागातील तिकीट दरात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. PMP चे दर एसटी बस (ST Bus) प्रमाणे (ST Bus) होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांना वापर करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी पुणेकर जनतेला दिले होते. मात्र, दुसरीकडे, सार्वजनिक वाहनांच्या तिकिटदरांत मोठी वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसत आहे.
PMP ने मनपा ग्रामीण भागातील तिकिटांचे दर एसटी बसप्रमाणे वाढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुणेकरांना अतिरिक्त भाडेवाढीचा सामना करावा लागणार आहे. त्याचबरोबर पुणेकरांसाठी सुरू केलेला दैनंदिन 70 रुपयांचा पासही बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMP) गेल्या ऑक्टोबर महिन्यात PMP च्या मासिक पाससाठी महापालिका हद्दीनिहाय निश्चित केलेल्या दर कपातीची घोषणा करण्यात आली होती. पीएमपी संचालक मंडळाच्या दोन सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत पासच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सात सप्टेंबरपासून नवीन दर लागू होतील, असे जाहीर केले होते. मात्र, आता PMP ने दोन्ही महापालिकांसह ग्रामीण हद्दीत 70 रुपयांची दैनदिन पास रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.