Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगशिवेंद्रराजे म्हणाले, उदयनराजे बोगस माणूस

शिवेंद्रराजे म्हणाले, उदयनराजे बोगस माणूस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

निवडणुका आल्या की, उदयनराजे बोंबलतात. सभासद नसताना कारखान्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकार नाही. मला सभासद विचारतील तुम्ही कोण? दहा दिवसांत उसाचे पेमेंट करणारा अजिंक्यतारा कारखाना आहे. हा जर उदयनराजेंना भ्रष्टाचार वाटत असेल तर त्यांची बुद्धी, डोळे व कान तपासले पाहिजेत. कारखान्याच्या कामकाजावर मला उदयनराजेंच्या सर्टिफिकेटची गरज नाही. उदयनराजे बोगस माणूस असून, ते बोगसच सर्टिफिकेट देणार, अशा जहरी शब्दांत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडले.



अजिंक्यतारा कारखान्यावर खा. उदयनराजेंनी टीका केल्यानंतर आ. शिवेंद्रराजेंनी त्याचा समाचार घेतला. साखर आयुक्‍त आम्हाला पत्र लिहतात एफआरपी सर्वात आधी दिला म्हणून. त्यांचे वय वाढेल तशी बुध्दी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे त्यांना तसं दिसायला लागलं आहे. नगरपालिकेत ते फेल गेल्याने त्यांना फस्ट्रेशन यायला लागले आहे.

छत्रपतींचा विचार सांगण्याच्या अधिकारात काही गॅजेट वगैरे निघाले आहे का सर्टिफिकेट देण्याचे? उदयनराजेंनी सर्टिफिकेटचा कारखाना काढला आहे का? असे सवाल करून शिवेंद्रराजे म्हणाले, उदयनराजे निवडणुका आल्या की आम्ही राजे, जनता असे करतात. ते अजून सतराव्या शतकातच आहे. ते माणसात उतरायला तयार नाहीत. म्हणून त्यांनी मध्यंतरी हत्तीचा पाय काढा आणि चिरडतो म्हणाले. शासनाला हत्ती परवडेना आणि तुम्ही कोठून हत्ती आणणार?

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटी यांची निवडणूक जवळ आली की उदयनराजे कारखान्यावर आरोप करतात. मात्र, कारखाना निवडणूक आली की ती बिनविरोध होते. उदयनराजेंना त्यांचे बगलबच्चे खोटी माहिती देतात. आमच्या कारखान्याने कोरोनाच्या काळात कामगारांना एकरकमी पगार दिले. हा भ्रष्टाचार असेल तर त्यांचे डोळे, कान व बुध्दी तपासली पाहिजे.

कारखान्याला ऊस घालणार्‍यांनी कारखान्याबद्दल बोलावे. उदयनराजे सभासद नसल्याने त्यांचा काही संबंध नाही. कारखान्यावर आरोप करण्याचा अधिकार कोणी दिला? आरोप करण्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा ऊस कुठे न्यायचा, याच नियोजन करा. त्यांनी कधी शेती केली नाही, असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -