Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहामार्गावर चारचाकी गाडी शिकणाया युवक,युवतीचे नियंत्रण सुटले अन्

महामार्गावर चारचाकी गाडी शिकणाया युवक,युवतीचे नियंत्रण सुटले अन्

सातारा शहरातील पुणे- बंगळूर महामार्गाजवळ असलेल्या शिवराज पेट्रोल पंप येथे चारचाकीचा अपघात झाला. युवक आणि युवती चारचाकी गाडी शिकत असताना हा अपघात झाला असून चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. सातारा शहराबाहेर असलेल्या शिवराज पेट्रोल पंप परिसरात असलेल्या सर्व्हिस रोडवर गाडी शिकत होते. यावेळी गाडी शिकत असलेल्या युवतीचा अंदाज चुकल्याने गाडी डिव्हायडर ओलांडून महामार्गावर आली. सुदैवाने महामार्गावर गाडी आली तरी कोणतीही दुखापत झालेली नाही.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती. गाडीमध्ये अडकलेल्या युवक आणि युवतीला बाहेर काढण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -