ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला. काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी ३ हजार ३ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना एसटी महामंडळासाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एसटी महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बस गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
यासोबतच त्यांनी बसस्थानकांचा दर्जा सुधारणे, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाईल, असेही सांगितले. या सर्व खर्चासाठी परिवहन विभागासाठी ३ हजार ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.