Monday, December 23, 2024
Homeनोकरीराज्यात लवकरच तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वनरक्षक, शिक्षक पदांची महाभरती : जाणून घ्या...

राज्यात लवकरच तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वनरक्षक, शिक्षक पदांची महाभरती : जाणून घ्या विशेष माहिती

ताजी बातमी /ऑनलाइन टीम
आगामी काळात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त होणार आहेत . यामुळे या रिक्त पदांवर राज्य शासनाकडुन मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . कारण राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांच्या नविन 33 वर्षे सेवानियम विधेयक मंजुर केले जाणार आहे . यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची मुदतपुर्व सेवानिवृत्ती घेतली जाणार आहे .

यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निमार्ण होणार आहे . यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त होतील . यामुळे शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात राबविण्यात येईल . त्याचबरोबर शिपाई पदांची पदे शिक्षकांच्या पदांनंतर मोठ्या संख्येने रिक्त होतील . यामुळे शिपाई पदांवर देखील मोठी महाभरती केली जाणार आहे .परंतु शिपाई पदांसाठी आवश्यक त्याच ठिकाणीच पद भरती केली जाणार आहे . अनावश्यक /अत्यावश्यक नसणाऱ्या ठिकाणी कंत्राटी /रोजंदारी पद्धतीने भरती केली जाणार आहे.

त्याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये वनखात्यामध्ये वनरक्षक , वन सर्वेक्षक चालक अशा पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे . त्याचबरोबर पाणीपुरवठा व महसुल विभागामध्ये तलाठी पदांसाठी भरती केली जाणार आहे . कारण तलाठी पदांच्या अनेक पदे रिक्त आहेत . यामुळे प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे . त्याचबरोबर ग्रामसेवक पदांचेही अनेक पदे 2015 नंतर मोठ्या संख्येने भरलेले नाहीत .यामुळे या पदावर देखील मोठी भरती केली जाणार आहे .

त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिस शिपाई पदे हे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार भरायचे असतात . महाराष्ट्राची लोकसंख्या विचारात घेता आवश्यक पोलीसांची भरलेले नाहीत . यामुळे या पदावर देखिल मोठी भरती केली जाणार आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -