ताजी बातमी ऑनलाईन टीम
महागाईमुळे (Inflation) सर्वसामान्य जनता खूपच त्रस्त झाली आहे. या नाही तर त्या वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत. अशामध्ये सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. घरगुती गॅस सिलेंडर (Gas Cylinder) आता स्वस्तात मिळणार आहे. होळीच्या आधी जर तुम्ही जर तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. तुम्हाला फक्त 634 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे.
देशातील सरकारी तेल कंपन्यांनी (government oil companies) ग्राहकांसाठी एक चांगला आणि फायदेशीर पर्याय आणला आहे. म्हणजेच ग्राहकांना फक्त 634 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे. सरकारी इंधन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी स्वस्त सिलिंडरची योजना आणली आहे. महागाईच्या काळात ग्राहकांना फक्त 634 रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे
या सिलिंडरचे नाव कम्पोजिट सिलिंडर आहे. फक्त 634 रुपयांमध्ये हा गॅस सिलेंडर मिळणार आहे. हा 14 किलोच्या सिलिंडरच्या वजनाच्या तुलनेत हलका आहे. यासोबतच हा गॅस सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे खूप शक्य आहे. कारण हा कम्पोजिट सिलेंडर (Composite cylinder) वजनाने खूपच हलका असतो. सामान्यपणे घरी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर 50 टक्क्यांनी हलका आहे. हा सिलिंडर एका हातानेदेखील उचलू शकतो. महत्वाचे म्हणजे या गॅस सिलेंडरमध्ये ग्राहकांना 10 किलो गॅस मिळणार आहे. त्यामुळेच या सिलिंडरची किंमत सुद्धा कमी आहे. हा सिलिंडर पारदर्शी आहेत.