Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : बाळूमामा भंडारा सोहळ्यात नाथांची भाकणूक

Kolhapur : बाळूमामा भंडारा सोहळ्यात नाथांची भाकणूक

मराठा सैनिक निधड्या छातीने लढेल, पाकिस्तानचा चौथाई भाग भारतात येईल, चीन भारतावर आक्रमण करेल, देशात समान नागरी कायदा येईल, जगातील मुस्लिम राष्ट्रे उद्ध्वस्त होतील, अशी विविध भाकिते मूळक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या मेतके (ता. कागल) येथील सद्गुरू बाळूमामा व श्री हालसिद्धनाथांच्या भंडारा सोहळ्यात झालेल्या भाकणुकीत करण्यात आली. हालसिद्धनाथांचे भाकणूककार भगवान डोणे-वाघापूरकर यांनी मंगळवारी पहाटे ही भाकणूक केली.

यावेळी झालेली अन्य भाकिते अशी : सीमाभागात गोंधळ होईल, कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडेल, वैरण सोन्याची होईल, वैरण व पाण्याची चोरी होईल, दीड महिन्याचे धान्य पिकेल, शेतकर्‍याच्या हातात भाकर व खांद्यावर चाबूक राहील, सामान्य माणूस आनंदात राहील, दुधाचा भाव वाढत राहील, नदीकाठची जमीन ओसाड पडेल, महागाई वाढत राहील, दागिने-पैसे मनुष्याला घातक ठरतील, उसाचा काऊस होईल, ऊसदरासाठी आंदोलने होतील, भगवा झेंडा राज्य करेल, शर्यतीचा बसवा शाप देईल, जाती-धर्मात तेढ वाढेल. या भाकणूक कथनप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -