Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्ररंगपंचमी धुमधडाक्यात : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली 'ही' घोषणा

रंगपंचमी धुमधडाक्यात : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ घोषणा

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने नाशिकमधील निर्बंध मागे घेण्याची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.१८) केली. पारंपारिक रहाड ऊघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर नाशिककरांची रंगपंचमी धुमधडाक्यात साजरी होणार आहे.

गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने घट झाली असून शहरात सध्या ५४ सक्रीय रूग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने नाशिकमध्ये रंगपंचमी ऊत्सवाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासर्व पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांना यंदाची रंगपंचमी उत्साहात साजरी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

शहरातील पारंपारिक रहाडी उत्सवालाही साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पोलिस विभागाकडून सोमवारी (दि.२१) त्याबाबतचे आदेश काढताना त्यात डीजेबाबतही योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. तोपर्यंत तयारी करावी, असे सूचना भुजबळ यांनी रहाड उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. दरम्यान, बैठकीच्या प्रारंभी माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्या नेतृत्वात शहरातील विविध भागांमधील रहाड ऊत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ना. भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी रहाडींना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -