Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणारा धान बोनस यंदापासून बंद,...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना मिळणारा धान बोनस यंदापासून बंद, पण…

ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांना (Farmers News) मिळणारा धान बोनस (Paddy Bonus) यंदापासून बंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. परंतु शेतकऱ्याच्या नावाने मिळणारी रक्कम ही शेतकऱ्याच्या हातातच जावी, यासाठी बोनसऐवजी शेतकऱ्याला प्रति एकर मदत करता येईल का? याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत माहिती केली. धान उत्पादकांचे थकीत असलेले 600 कोटी तात्काळ देण्यात येतील, अशी घोषणा देखील अजित पवार यांनी विधानसभेत केली.


शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शासनाने धान खरेदी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळत आहे. मात्र यावर्षीचा बोनस मिळालेला नाही. तो बोनस द्यावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी सभागृहात केली. याशिवाय भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2013 पासून सुरु केलेली बोनस देण्याची पद्धत सुरु ठेवावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना बोनस न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बोनसऐवजी शेतकऱ्यांनी जितक्या क्षेत्रावर धान उत्पादन केले, त्यानुसार त्याला मदत करता येते का? याची चाचपणी सुरू केली असल्याचे स्पष्ट केले.


मध्यप्रदेश, छत्तीसगढसारख्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हे तपासले जाईल. कारण राज्यसरकारने बोनस जाहीर केल्यानंतर शेजारच्या राज्यातील माल आपल्याकडे येतो आणि ते देखील बोनस मागतात. तसेच राज्यात देखील बोनस वाटताना तो शेतकऱ्यांना न मिळता मधले व्यापारी त्यात घोटाळा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे अजित पवार सभागृहात सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -