मोहरे (ता. शिराळा) येथील रविराज तुकाराम पाटील (वय 45) यांनी घरातील स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत कोकरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
रविराज पाटील विमा प्रतिनिधी असून, त्यांचे चरण येथे औषधांचे दुकान आहे. सोमवारी सकाळी रविराज घराच्या दुसर्या मजल्यावर गेले. काही वेळानंतर पत्नीने त्यांना हाक दिली. मात्र, उत्तर न आल्याने त्या दुसर्या मजल्यावर गेल्या. तेथे रविराज यांनी गळफास घेतल्याचे दिसले. यााबबतची फिर्याद वसंत पाटील यांनी कोकरूड पोलिसांत दिली आहे. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.