Sunday, August 3, 2025
Homeमहाराष्ट्रअहो चक्क, एसटी पिकअप शेड रातोरात चोरीला गेले: जिल्हाधिकायांकडे तक्रार

अहो चक्क, एसटी पिकअप शेड रातोरात चोरीला गेले: जिल्हाधिकायांकडे तक्रार

सातारा : परळी खोऱ्यातील भोंदवडे फाटा येथे चक्क एसटी थांबा असलेल्या ठिकाणी असलेले पिकअप शेड रातोरात चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले एसटी पिकअप शेडच्या चोरीचा विषय मोठा चर्चिला जावू लागला आहे. सन 2005 साली उभारण्यात आलेले शेड अचानक गायब झाल्याने याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे.

अरुण सदाशिव गुजर यांनी केलेल्या कंपाउंडच्या पुढे दोन फूट जागा सोडून बांधकाम करण्यात आले होते. मात्र सोमवारी रात्रीच्या वेळी जेसीबीच्या माध्यमातून हा बस थांबा जमीनदोस्त करण्यात आला आहे. याबाबत विस्तार अधिकारी व ग्रामपंचायतीचे प्रशासक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये हे बसस्थानक अरुण सदाशिव गुजर यांच्या जागेत येत नसताना केवळ अतिक्रमण करून जागा ताब्यात घेण्याच्या उद्देशाने त्यांनी परस्पररित्या कोणालाही न विचारता हे बसस्थानक पाडल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

सोमवारी रात्री 10 ते. दि. मंगळवार 22 रोजी सकाळी 6 या वेळेत ही घटना घडली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे शासकीय मालमत्तेचे साधारण 1 लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले असून बसथांब्याचा वापर सार्वजनिक होत असल्याने त्या ठिकाणी परळी विभागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. संबधिताने कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता पिकअप शेड हटविले आहे. तरी भोंदवडे येथील पाटेघर, रोडवरील शासकीय निधीमधून बांधण्यात आलेले बस थांबा भनशिता त्या काढून टाकला प्रकरणी राशिव गुजर यांची चौकशी करून
गुन्हा दाखल करणार प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बसथांब्याचा वापर सार्वजनिक होत असल्याने त्या ठिकाणी परळी विभागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. संबधिताने कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला न जुमानता पिकअप शेड हटविले आहे. तरी भोंदवडे येथील पाटेघर, रोडवरील शासकीय निधीमधून बांधण्यात आलेले बस थांबा अनधिकृतरित्या काढून टाकला प्रकरणी अरुण सदाशिव गुजर यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -