कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. नाना कदम यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
१२ एप्रिल, २०२२ रोजी होणाऱ्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये कमळ या चिन्हा समोरील बटण दाबून श्री. नाना कदम यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी प्रचारदरम्यान बोलताना केले.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब, माजी आमदार अमल महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित राजे घाटगे, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, राहुल चिकोडे, देवस्थान समिती माजी अध्यक्ष महेश जाधव, सुनिल कदम, उत्तम कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.