Monday, December 23, 2024
Homeसांगलीकवठेमहांकाळ : सलगरेत 5 लाखांची सुगंधी तंबाखू, पानमसाला जप्त

कवठेमहांकाळ : सलगरेत 5 लाखांची सुगंधी तंबाखू, पानमसाला जप्त

सलगरे (ता. मिरज) येथे बंदी असलेली सुगंधी तंबाखू व पानमसाला यांची वाहतूक करणार्‍या अमित अंकुश कदम (रा. लांडगेवाडी) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पाच लाखांची तंबाखू व पानमसाला आणि पिकअप गाडी असा 8 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हवालदार दीपक गायकवाड, अमिरशा फकीर, चंद्रसिंग साबळे यांना सलगरे येथून पिकअपमधून बंदी असलेली तंबाखू व पानमसाला यांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी सलगरे -जानराववाडी रस्त्यावर पिकअप (एम.एच. 42 एम.9541) गाडीची तपासणी केली. गाडीमध्ये पाच लाखांची सुगंधित तंबाखू व पानमसाला पोलिसांना आढळून आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -