सांगली येथील राजवाडा चौकातील न्यायालयाच्या इमारतीच्या पाठीमागील एका खोलीचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक नानासाहेब श्रीहरी अस्वले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले, राजवाडा चौकातील इमारतीमध्ये मिरजेतील न्यायालयाचे कामकाज चालते. मिरज न्यायालयाच्या समोरील बंद असलेल्या दुमजली इमारतीच्या पाठीमागील एका खोलीचा दरवाजा चोरीच्या उद्देशाने तोडण्याचा प्रकार घडला. शिपायाने हा प्रकार सांगितल्यानंतर अस्वले यांनी तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.