निपाणी शहर व उपनगरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसाआड घरफोडीचे प्रकार उघडकीस येत आहेत. यामध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, माजी सैनिक, सरकारी अधिकारी यांचीही घरे फोडली आहेत. सद्यःस्थितीचा विचार करता चोरट्यांचे डेरिंग वाढले असून पोलीस प्रशासन हतबल झाले आहे.
विशेष म्हणजे आज (दि.२६) शनिवारी दुपारी एकच्या सुमारास भरदिवसा प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांच्या नजरेस पडलेल्या आठ वर्षाच्या मुलाने घरफोडी करून रोखडसह सुमारे लाखाचा ऐवज लंपास करून पोबारा केला. ही घटना आडके प्लॉट येथे घडली.
यावेळी नागरिकांची नजर चुकवण्यासाठी संशयित आठ वर्षाच्या चोरट्याने पायातील बुटाचे जोड रस्त्यावर टाकून पलायन करून प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात आत्तापर्यंत निपाणी परिसरात ४० ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत.
संशयित आठ वर्षाचा चोरटा परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आला. चोरट्याने नजर चुकविण्यासाठी व तावडीतून आपली सुटका करण्यासाठी पायातील बुटाचे जोड भररस्त्यावर टाकून पलायन केले.
दरम्यान परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोटे यांच्यासह पोलिसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसूर यांच्यासह कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
मागच्या दोन महिन्यात आत्तापर्यंत परिसरात ४० ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी कोट्यावधी रुपयांचा ऐवज व रोखड लांबविली आहे.केवळ एकाच घरफोडीचा तपास लावण्यास पोलिस प्रशासनाला अपयश आल्याने पोलिस प्रशासनाच्या कामगिरीविषयी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.