Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात आजपासून 4 दिवस उष्णतेची लाट

राज्यात आजपासून 4 दिवस उष्णतेची लाट

सोमवारपासून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 4 ते 6 अंशांनी वाढ होणार आहे. हवामान विभागाने राज्यातील दहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अ‍ॅलर्ट’ दिला आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रात 28 ते 31 मार्च या कालावधीत हवेच्या उष्ण लहरी सक्रिय होत आहेत. त्यामुळे कमाल तापमान सरासरी 40 ते 41 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

एप्रिल महिन्याची सुरुवात होण्याआधीच उत्तर भारतात उन्हाचा कडाका वाढला असून, येत्या काही दिवसांत देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातही उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांतील पारा गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

काही ठिकाणचे तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस उत्तर भारतातील अनेक राज्यांत गरम हवा वाहण्याची शक्यता आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या ठिकाणी उष्ण लहरींचे प्रमाण जास्त असू शकते. उत्तर भारताबरोबरच पश्चिम आणि मध्य भारतातील पारा वाढण्याचाही अंदाज आहे. राजस्थानमधील बांसवाडा येथे दिवसाचे तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -