Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगवीज कर्मचाऱ्यांचा संप ; कोयना धरणाचे पायथा वीजगृह बंद

वीज कर्मचाऱ्यांचा संप ; कोयना धरणाचे पायथा वीजगृह बंद

महानिर्मिती कंपनी संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे कोयना धरण (Koyna Dam) पायथा वीजगृहातील दोन जनित्रे बंद पडली आहेत. यामुळे पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजता धरण भिंतीच्या पायथ्याशी असणाऱ्या विमोचक तथा आपत्कालीन दरवाजातून प्रतिसेकंद सिंचनासाठी पूर्वेकडे प्रतिसेकंद २ हजार ९८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती उपअभियंता कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी महानिर्मिती कंपनीच्या काही संघटनांनी २८ व २९ मार्चला बंद पुकारला आहे. या बंदचा कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्पालाही फटका बसला आहे. यामुळे कोयना धरणाच्या पायथ्याशी असणारा वीज निर्मिती प्रकल्प आता बंद पडला आहे. पायथा वीजगृहातील २० मेगावॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. उन्हाळ्यात सातत्याने सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढत असल्याने प्रामुख्याने या दिवसात या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सातत्याने पूर्वेकडे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -