राज्यात उन्हाची तिव्रता सुरुवातीपासूनच जाणवत आहे. यंदा तापमान जास्त राहणार असे वाटत असताना भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच आजपासून पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट राहणार आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरात राज्याकडून उष्णतेची लाट येणार आहे.
राज्यातील जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना (Jalna), परभणी (Parbhani) आदी जिल्ह्यात ही लाट अधिक प्रमाणात जाणवणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (MID) प्रादेशिक हवामान केंद्र, मुबईने वर्तविलेल्या शक्यतेनुसार जळगाव जिल्ह्यात आज 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान, उष्णतेची तीव्र लाट राहणार आहे. यासाठी जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने बचाव व उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे. त्यानुसार संबंधित सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगरपालिका व आरोग्य विभाग सतर्क आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी देखील या दरम्यान, उपाययोजना राबवावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केली आहे.
या जिल्ह्यात राहणार उष्णतेची लाट
-29 मार्च 2022 – जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती.
-30 मार्च 2022 – जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती.
-31 मार्च 2022 – जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर.
-1 एप्रिल 2022 – जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी आणि हिंगोली.