केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. या संपात वाई तालुक्यातील महावितरणमधील कंत्राटी अधिकारी तसेच कामगारही सहभागी झाले असून त्यांनी आज दुसऱ्या दिवशी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.
कालपासून केल्या जात असलेल्या देशव्यापी संपात वाई तालुक्यातील वर्कर्स फेडरेशन इंटक संघटना, सबोडीनेट इंजिनीअरिंग असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक संघटना, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना, कामगार महासंघ, लाईनस्टाप इलेक्ट्रीसिटी असोसिएशन, वीज मंडळ शिकाऊ कामगार संघटना आदी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आजही यामध्ये सहभाग घेतला आहे.
आज महावितरण कार्यालयासमोर केल्या जात असलेल्या संपात संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अमोल गिरमे, सचिव तुषार भागवत, समितीचे विभाग अध्यक्ष महेश कर्णे, श्रीमंत थोरात, लाईनस्टापचे राहुल तिवारणे, बाळासाहेब पवार, स्वत्नील जाधव, मकरंद गोंजारी, अमोल डेरे यांच्यासह महिलांनीही सहभाग घेतला आहे.