Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंग‘या’ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद! यादीत तुमचा मोबाईल आहे का? चेक करा

‘या’ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद! यादीत तुमचा मोबाईल आहे का? चेक करा

व्हॉट्सअ‍ॅप हे जगात सर्वाधिक प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे. हे मेसेजिंग अ‍ॅप सध्या मार्केटमधील बहुतेक स्मार्टफोन्सशी सुसंगत आहे, पण तुम्हाला माहीत असायला हवं की, मोबाईलमधील कालबाह्य झालेल्या अँड्रॉईड, आयओएस किंवा इतर सॉफ्टवेअर आवृत्त्यांमुळे हे प्लॅटफॉर्म काहीवेळा निरुपयोगी बनते आणि जसजशी सॉफ्टवेअर जुनी होत जातात, तसतसं व्हॉट्सअ‍ॅप कडून सपोर्ट हटवला जातो. म्हणजेच काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप चालत नाही ते काम करणं बंद करतं.

मग अशा वेळी आपल्याला आपला स्मार्टफोन्सला अपग्रेड करावं लागेल. म्हणजेच अँड्रॉइड यूजर्सला त्यांचा अँड्राईड स्मार्टफोन अद्ययावत व्हर्जनचा घ्यावा लागेल किंवा काही स्मार्टफोन्सला सॉफ्टवेअर/व्हर्जन अपडेट करण्याचा पर्यायदेखील मिळतो. यामुळे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा वापरू शकता. यामुळे आपण आपला फोन आणि Apps नेहमी अपडेट करायला हवेत.

कोणत्या स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद ?

आता वार्षिक अपडेट म्हणून 31 मार्चपासून काही अँड्रॉईड (Android), आयओएस (iOS) आणि कायओएस (KaiOS) व्हर्जन असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या FAQ वेबसाईटवर दिली आहे.

तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये Android 4.1 किंवा उच्च आवृत्ती नसल्यास व्हॉट्सअ‍ॅप काम करणं थांबवणार आहे. तुमचे खाते सत्यापित (validate) करण्यासाठी तुम्हाला फोन नंबर किंवा एसएमएस नंबरची आवश्यकता असेल. याशिवाय KaiOS version 2.5 किंवा त्यानंतरच्या व्हर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्सला जेलब्रोकन आयफोन न वापरण्याचा सल्ला दिला आहे.

जिओ फोन (JioPhone) आणि जिओ फोन 2 (JioPhone 2) या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू राहील तर शाओमी (Xiaomi), सॅमसंग (Samsung), एलजी (LG) आणि मोटोरोला (Motorola) या कंपन्यांच्या काही स्मार्टफोन्समध्ये 31 मार्चनंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद केलं जाणार आहे.

खालील स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद:

1) शाओमी – शाओमी हाँग एमआय (Xiaomi HongMi), एमआय 2a, एमआय2s, रेडमी नोट 4G आणि हाँग एमआय 1s.
2) एलजी – एलजी ऑप्टिमस F7, एलजी ऑप्टिमस L3 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F5, एलजी ऑप्टिमस L5 II, एलजी ऑप्टिमस L5 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L3 II, एलजी ऑप्टिमस L7 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस L7 II, एलजी ऑप्टिमस F6, एलजी एनॅक्ट, एलजी ऑप्टिमस L4 II ड्युएल, एलजी ऑप्टिमस F3, एलजी ऑप्टिमस L4 II, एलजी ऑप्टिमस L2 II, एलजी ऑप्टिमस F3Q.
3) सॅमसंग – सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाईट, गॅलेक्सी S3 मिनी, गॅलेक्सी एक्स कव्हर 2 आणि गॅलेक्सी कोअर.
4) ह्युवाई – ह्युवाई Ascend D, क्वाड XL, ह्युवाई Ascend D1, अॅक्सेंड P1 S. 5) मोटोरोला – मोटोरोला Droid Razr.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -