ताजी बातमी ऑनलाईन टीम
परवीन बाबी (४ एप्रिल १९४९ – २० जानेवारी २००५) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सदाबहार अभिनेत्री होती. (Parveen Babi) आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबीने हिंदी सिनेइंडस्ट्रीला एकापेक्षा एक चित्रपट दिले. आज तिचा जन्मदिवस. (Parveen Babi) अमर अकबर ॲन्थोनी, दीवार, नमक हलाल, शान यांसारखे सुपरहिट चित्रपट तिच्याच नावे आहेत. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिका आजही वाखाणण्याजोगे आहेत. परवीन आणि अमिताभ बच्चनसोबतची तिची जोडी लोकप्रिय होती. कधी लिव्ह ईन रिलेशनशीप तर कधी विवाहित व्यक्तीसोबत रिलेशनशीपला घेऊन ती चर्चेत होती. अफेअर्सनंतरदेखील ती शेवटी एकटीच राहिली. दुर्देवाने अखेरच्या क्षणी तिच्याजवळ कोणीही नव्हते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणार्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊया.
अभिनयातील करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना तिने १९८३ साली अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला. एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान तिची मानसिक स्थिती काहीशी बिघडल्याची चर्चा सुरू होती.
७० च्या दशकातील एक प्रसिध्द अभिनेत्री परवीन बाबीने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. तिने चित्रपटांमध्ये ग्लॅमरस कपडे घालण्याची प्रथा सुरू केली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्याआधी अभिनेत्री स्लीवलेस ब्लाउजसोबत साडी आणि घट्ट सूट घातलेले दिसत असत. परवीनची प्रतिमा सिनेइंडस्ट्रीत बोल्ड ॲक्ट्रेस अशी होती. १९७६ ते ८० च्या दशकात ती इंडस्ट्रीमध्ये सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये दुसर्या क्रमांकावर होती.
बिनधास्त, सिगारेट ओढणाऱ्या परवीन बाबीचा रहस्यमयी झाला होता मृत्यू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -