ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेली एक वर्ष टीम इंडियासाठी दमदार कामगिरी करणारा फलंदाज केएल राहुल याने यंदाच्या आयपीएलमध्येही धमाकेदार सुरुवात केली आहे. सोमवारी त्याने सनराइजर्स हैदराबाद संघाविरोधात अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीमुळे आतात्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली असून, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली, कर्णधार रोहित शर्माच्या यादीत त्याच्या नावे आले आहे.
मागील आयपीएल स्पर्धेतही केएल राहुल याने आश्वासक कामगिरी केली होती. मागील काही दिवस त्याने आपल्या खेळीत दाखवलेले सातत्यामुळे क्रीडा समीक्षकांकडूनही त्याचे कौतुक होत आहे. यंदाचा आयपीएलमध्येही त्याची कामगिरी सरस ठरत आहे. सोमवारी त्याने सनराइजर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. ही कामगिरी करत केएल राहुल याने टी-२० क्रिकेटमध्ये अर्धशतक खेळीचे अर्धशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणार तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.
खेळाडू सामने अर्धशतकी खेळी
विराट कोहली ३२८ ७६
रोहित शर्मा ३७२ ६९
शिखर धवन ३०५ ६३
सुरेश रैना ३३६ ५३
केएल राहुल १७५ ५०