Tuesday, July 29, 2025
Homeमहाराष्ट्रखुशखबर! आता लसीकरण झाले नसले तरी बिधास्त करा लोकलने प्रवास!

खुशखबर! आता लसीकरण झाले नसले तरी बिधास्त करा लोकलने प्रवास!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

Mumbai Local: कोरोना महामारीमुळे (Covid 19) गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र निर्बंध (Restrictions) लावण्यात आले आहे. निर्बंधात वावरणाऱ्या जनतेला (Public) मोठा दिलासा देत राज्य सरकारने 1 एप्रिल 2022 पासून कोरोना निर्बंध शिथिल केले आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने (Railways) देखील आपल्या नियमात बदल केला आहे. नवीन नियमानुसार रेल्वेने लसीकरणाशी (Vaccination) संबंधित पर्याय आपल्या तिकीट ॲपमधून (Railways Ticket App) हटविला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना लसीकरण झाले असो किंवा नाही तरी देखील लोकलने (Mumbai Local) प्रवास करता येणार आहे. याआधी लसीकरण झाल्याशिवाय रेल्वेने प्रवास करता येत नव्हता.


रेल्वेने कोरोना संबंधित सर्व निर्बंध उठवले आहे. मुंबईतील रेल्वेसाठी काउंटरवर आणि ॲपवर सार्वांसाठी तिकीट सुविधा सुरु केली आहे. याबाबत रेल्वेने सांगितले की, कोरोनाच्या निर्बंधादरम्यान, सर्व अधिकृत प्रवेश-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्केलेटर, पादचारी पूल, सर्व व्यवसायिक तिकीट काउंटर आणि बुकिंगसाठीची एटीव्हीएम मशीन बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता या सर्व गोष्टी पूर्ववत सुरु करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनची तिकीटे आणि पास फक्त दोनदा लसीकरण झालेल्या नागरिकांनाच मिळत होते आणि राज्य सरकारच्या पोर्टलद्वारा लसीकरण प्रमाणपत्र आणि युनिवर्सल पासशी जोडणे अनिवार्य होते. याला विरोध करत नागरीकांनी उच्च न्ययालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. आता सरसकट सर्वांना रेल्वे प्रवास करता येणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

65 लाखांवर पोहोचली प्रवासी संख्या
राज्यात कोरोनाची लाट आटोक्यात आल्याने 1 एप्रिल 2022 पासून सर्व निर्बंध हटविण्यात आले आहे. निर्बंध हटविल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यानुसार मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास 65 लाखावर पोहोचली आहे. यात मध्य रेल्वेवर जवळपास 35 लाख तर पश्चिम रेल्वेवर 29 लाखा पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहे. दरम्यान, कोरोनाच्या या महामारीच्या काळात रेल्वेला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रेल्वेच्या महसुलात जवळपास 1000 कोटींचा तोटा झाला. आता निर्बंध शिथील झाल्यानंतर परिस्थिती हळहळू पूर्वपदावर येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -