आयपीएल (IPL 2022) चा १५ वा सीझन भारतात खेळवला जात आहे. यंदा आयपीएलमध्ये १० संघ खेळत आहेत. जवळपास सर्व संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. बुधवारी आयपीएलचा 14वा सामना KKR आणि MI यांच्यात झाला. ज्यात मुंबई संघाला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई इंडियन्सचा हा सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत.
मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. या संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर सीएसकेचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांनी 4 वेळा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. या मोसमात मुंबई आणि चेन्नई संघांची सुरुवात पराभवाने झाली. या दोन्ही संघांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई हे संघ सर्वोत्कृष्ट मानले जातात, परंतु या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक झाली आहे.
दुसरीकडे, जर आपण आयपीएल २०२२ च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर मुंबईचा संघ ९ व्या स्थानावर आहे आणि चेन्नई सुपर किंग्ज ८ व्या स्थानावर आहे. गेल्या १४ वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे. जेव्हा मुंबई आणि सीएसकेच्या संघांना लागोपाठच्या तिन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्याने दोन्ही संघांच्या कामगिरीवर चाहते नाराज झाले आहेत. दोन्ही संघाविरुद्ध सोशल मीडियामध्ये लोक संताप व्यक्त करत आहेत. चाहते मीम्स आणि ट्विटच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.