Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रसिगारेटचे चटके देऊन 18 वर्षीय तरुणीचे कपडे फाडले

सिगारेटचे चटके देऊन 18 वर्षीय तरुणीचे कपडे फाडले

ताजी बातमी ऑनलाइन टीम

पुणेसह पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या शौचालयात बलात्कार (Rape in Pune) झाल्याच्या घटनेने काही दिवसांपूर्वी पुणे शहर हादरलं होतं. ही घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना उडकीस आली आहे. 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. सिगारेटचे चटके देऊन तिच्या अंगावरचे कपडे फाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली. पीडित तरुणीने या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सिगारेटचे चटके देऊन कपडे फाडत तरुणीचा विनयभंग (Molestation) करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली. पाण्याची ड्रम घ्यायचा आहे, असं सांगून आरोपी (Pune Crime) पीडित तरुणीच्या घरात घुसला. नंतर त्याने पीडितेला सिगारेटचे (Cigarette) चटके देऊन तिच्या अंगावरील कपडे फाडले. असा जबाब पीडित तरुणीने पोलिसांसमोर नोंदवला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना 5 एप्रिलला घडली. पीडित तरुणी घरात एकटीच होती. याचा फायदा घेत आरोपी तरुण दरवाज्यात आला. पाण्याचा ड्रम घ्यायचा आहे, असं सांगून तो घरात घुसला. घरात दुसरं कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने तरुणीला सिगारेटचे चटके दिले. बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. नंतर आरोपीने त्याच्या एका साथीदाराला बोलावून घेतले. त्याने तिचे कपडे फाडले, असे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दोन्ही अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -