ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. मागच्या 70 वर्षात जे जे उभारलं, घडवलं, ते ते विकायचं काम मागच्या 7 वर्षात केलं गेलं, त्यामुळे हे कुणी केलं हे आपण विसरता कामा नये. असा गंभीर आरोप करीत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नाव न घेता थेट मोदींवर प्रहार केला आहे. महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्या कोल्हापूरातील महिला मेळावा आज पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, अनेक कंपन्या विकूनही वर तोंड करून हे लोक विचारतात की गेल्या 70 काँग्रेसने वर्षात काय केले? मग एवढं खोटं नाटं पसरवलं जात असेल तर माझ्या आई बहिणींनीसह प्रत्येक महिलेने आई भवानीचं रूप धारण करून याविरोधात लढलं पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी कोल्हापूरकरांना केले.
विचित्र ताई आरडाओरडा करायला कुठेही पोहचतात
चित्रा नाही तर यांना विचित्रा ताई म्हंटल पाहिजे. स्वत:च दिवे बंद करायचे, स्वत:च दगड फेकायचे, अशा या विचित्रा वाघ आरडाओरडा करायला कुठेही पोहोचतात. ज्यांनी आरडाओरडा करावा त्यांनी आधी स्वतःच्या घरात बघावं असा आरोपही मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला. स्वत: अग्निदिव्याचा सामना करणाऱ्या चित्रांची ताईंच्या तोंडी आग टाकून जीभ जाळण्याचे काम भाजप करते आहे. चित्राताई भाजपात का गेल्यात हे आपल्याला कितीही माहिती असले तरीही आपल्यापेक्षा हे चित्रा ताईंनाच जास्त माहिती आहे. भाजपाकडून वापर चित्रा वाघ यांचा पद्धतशीरपणे वापर सुरू आहे. पुढच्या काळात त्यांना त्यांची अनुभूती येईल. ज्या संस्कृतीमध्ये महिलांचा मान सन्मान होत नाही, तर त्या संस्कृतीमध्ये मूळ भाजपाच्या महिलाना बाजूला सारून चित्रा ताईंमाध्यमातून आगी लावण्याचा कुटिल डाव भाजप करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिला कुठे दिसतात का? असा प्रश्नही मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.