ताजी बातमी ऑनलाईन टीम
IPL 2022 मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये (DC VS LSG) सामना झाला. लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद नंतर लखनौ सुपर जायंट्सने आज दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने (Ayush Badoni) षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या. या विजयामुळे लखनौचा आत्मविश्वास उंचावला आहे. दिल्लीच्या संघातून आज एनरिच नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे मोठे खेळाडू खेळले.
लखनौ सुपर जायंट्सने विजयाची हॅट्ट्रिक केली. चेन्नई सुपर किंग्स, SRH नंतर LSG ने आज दिल्ली कॅपिटल्सला हरवलं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयुष्य बदोनीने षटकार ठोकून लखनौच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शार्दुल ठाकूर अखेरच षटक टाकत होता. सामना रंगतदार स्थितीत असताना आयुषने चौकार-षटकार ठोकून लखनौला तिसरा विजय मिळवून दिला. 6 विकेट आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लखनौने चार बाद 155 धावा केल्या.