Monday, July 28, 2025
Homeक्रीडाKKR vs DC IPL 2022: कुलदीप यादवच्या फिरकीसमोर कोलकाताची दाणादाण, दिल्लीचा 44...

KKR vs DC IPL 2022: कुलदीप यादवच्या फिरकीसमोर कोलकाताची दाणादाण, दिल्लीचा 44 धावांनी मोठा विजय

ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 19व्या सामन्यात कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) फिरकीच्या जाळ्यात अडकलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. कुलदीपने चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. तत्पूर्वी डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) 45 चेंडूत 61 धावा आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) 29 चेंडूत 51 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने कोलकातासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कोलकाताकडून 54 धावांची जोरदार खेळी केली. मात्र तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 215 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 171 धावांत सर्वबाद झाला.


लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात अतिशय खराब झाली. 38 धावांपर्यंत मजल मारताना संघाने व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि 33 चेंडूत 54 धावा ठोकल्या. नितीश राणानेही 20 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले. मात्र ते संघाला विजयापर्यंत नेऊन पोहचू शकले नाहीत. त्यान पॅट कमिन्स, सॅम बिलिंग्ज, सुनील नरेन यांना देखील धावा करण्यात फारसे योगदान देता आले नाही आणि कोलकाताला 44 धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला.


कोलकाताने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. पृथ्वीने सुरुवातीपासूनच वेगवान धावा करत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 29 चेंडूत 51 धावांची खेळी केली. नवव्या षटकात वरुण चक्रवर्तीने त्याला क्लीन बोल्ड केले. येथून कर्णधार ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात 55 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर अक्षर पटेलने 14 चेंडूत नाबाद 22 आणि शार्दुल ठाकूरने 11 चेंडूत नाबाद 29 धावा ठोकून दिल्लीचा स्कोअर 215 धावांपर्यंत नेऊन पोहोचवला. हा या हंगामातील सर्वोच्च स्कोअर ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -