व्हॉट्सअॅपआपल्या यूजर्ससाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट घेऊन येते. या अपडेट्सद्वारे कधी व्हॉट्सअॅपची सुरक्षा फीचर्स मजबूत केले जातात तर कधी यूजर्संसाठी नवीन फीचर्स सादर केले जाते. आता ताज्या रिपोर्टनुसार, WhatsApp आपल्या Android वापरकर्त्यांसाठी नवीन डिसअपीयरिंग मेसेज अपडेट आणि ड्रॉईंग एडिटर यासारखे नवीन फीचर्स सादर करण्याची तयारी करत आहे. आता व्हॉट्सअॅप डिसअपीयरिंग मेसेजसाठी मीडिया व्हिजिबिलिटी ऑप्शनमध्ये बदल करत आहे.
व्हॉट्सअॅपने काही महिन्यांपूर्वी यूजर्संसाठी डिसअपीयरिंग मेसेज फीचर (Disappearing messages) सादर केले होते. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार याआधी व्हॉट्सअॅपवर येणार्यां सर्व मीडिया फाइल्स डिफॉल्ट म्हणून गॅलरीमध्ये सेव्ह केल्या जात होत्या. परंतु नवीन अपडेटनंतर तुम्हाला सेटिंग्ज बदलून हे काम मॅन्युअली करावे लागेल.
WABetaInfo नुसार, WhatsApp डिसअपीयरिंग चॅटसाठी मीडिया व्हिजिबिलिटी (media visibility) पर्याय आपोआप बंद करत आहे. त्यानंतर रिसीव्हरच्या फोन गॅलरीमध्ये चित्रे दिसणार नाहीत. असे केल्याने डिसअपीयरिंग मेसेज फीचर वापरणे अधिक सुरक्षित आणि खाजगी होईल. यासाठी आयफोनवरील डिसअपीयरिंग चॅटसाठी सेव्ह टू कॅमेरा रोलचा ( Save to Camera Roll) चा पर्याय दिसणार नाही. WhatsApp हा बदल iOS साठी देखील करत आहे.
नवीन ड्रॉईंग टूल्स
दुसर्यार एका अपडेटमध्ये WhatsApp ने नवीन ड्रॉईंग टूल्स – नवीन पेन्सिल आणि ब्लर टूल्स जारी केले आहेत. ब्लर टूल पूर्वी WhatsApp iOS वर लागू करण्यात आले होते, ते आता Android वर देखील आले आहे. तुम्ही Play Store वरून लेटेस्ट बीटा इंस्टॉल केल्यास नवीन ड्रॉईंग टूल्स देखील वापरण्यास सक्षम असाल.
Whatsapp Update: ड्रॉईंग टूलसह वाढवले सुरक्षा फीचर्स, परवानगीशिवाय सेव्ह होणार नाहीत Photo आणि Video
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -