तुमच्याकडे 1 रुपयाचे नाणे नक्कीच असेल. जर तुम्ही दुकानात गेलात आणि दुकानदाराने नाणे स्वीकारण्यास नकार दिला तर? बऱ्याच लोकांना 10 रुपयांच्या नाण्यांबाबत ही अडचण येत होती, मात्र आजकाल लोकं 1 रुपयाबद्दलही अशाच तक्रारी करत आहेत. जर तुमच्यासोबतही असे घडले तर तुम्ही काय करू शकता?
RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पोस्ट ऑफिस सर्व प्रकारच्या नोटा आणि नाणी स्वीकारतात. त्यामुळे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 1 रुपयाचे नाणे जमा करू शकता किंवा तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही काही खरेदीही करू शकता. याचा अर्थ पोस्ट ऑफिसला तुमचे नाणे स्वीकारावे लागेल.
व्यक्तीने ट्विटरवर तक्रार केली वास्तविक, एका व्यक्तीने ट्विटरवर RBI, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या ऑफिसला टॅग करत तक्रार केली. सुधांशू दुबे नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून 1 रुपयाच्या नाण्याचे छायाचित्र शेअर करताना विचारण्यात आले की, भारतात अशी नाणी बंद झाली आहेत का? जर हो असेल तर लोकांकडे असलेली अशी नाणी कुठे जमा होतील आणि जर नसेल तर दुकानाव्यतिरिक्त भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ही नाणी कशी नाकारली जाऊ शकतात?