Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगसरकारी कर्मचारी होणार मालामाल..! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..!

सरकारी कर्मचारी होणार मालामाल..! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नुकतीच 3 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवर पोचलाय. त्यानंतर आता मोदी सरकार कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते…

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून एक मागणी केली जातेय.. ती म्हणजे, ‘फिटमेंट फॅक्टर’..! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढवण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे. किमान मूळ वेतन (Basic Salary) 18 हजारांवरुन 26 हजार रुपये, तर ‘फिटमेंट फॅक्टर’ 2.57 वरून 3.68 पट करण्याची मागणी होत आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झालीय. आता कर्मचाऱ्याच्या ‘फिटमेंट फॅक्टर’साठी सुरु असलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार असल्याची चर्चा आहे.. त्याआधी ‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे नेमकं काय, याबाबत समजून घेऊ या..

‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे काय..?

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराचे ‘कॅल्क्युलेशन’ हे सातव्या वेतन आयोगाच्या ‘फिटमेंट फॅक्टर’नुसार केले जाते. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, सध्या ‘फिटमेंट फॅक्टर’ 2.57 आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन बँडमध्ये ग्रेड-पे जोडून मूळ वेतन करण्यात आले. त्यात सध्याचा एंट्री लेव्हलचा पगार हा ‘फिटमेंट फॅक्टर’ 2.57 ने गुणाकार करून ठरवला होता.

कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार मूळ वेतनात वाढ करण्यासह सरकारने ‘फिटमेंट फॅक्टर’ फॉर्म्युलामध्ये बदल केल्यास, पगारात एकाच वेळी मोठी वाढ होईल. सध्याचा ‘फिटमेंट फॅक्टर’ फॉर्म्युला 2.57 इतका आहे. त्यात वाढ झाल्यास तो 3.68 पट होईल.

किती पगार हातात येईल..?

सध्या किमान वेतन 18 हजार रुपये आहे. ‘फिटमेंट फॉर्म्युला’ 2.68 नुसार कर्मचाऱ्यांची ‘स्टार्टिंग सॅलरी’ 46 हजार 260 रुपये होते. मूळ पगार दरमहा 26 हजार रुपये झाला नि नवीन ‘फिटमेंट फॅक्टर’ वापरल्यास एकूण पगार 26 हजार रुपयांच्या 3.68 पट होईल. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 95 हजार 680 रुपये पगार मिळेल.

दरम्यान, फिटमेंट फॅक्टरसोबतच आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, घरभाडे भत्त्यातही (HRA) वाढ केली जाणार असल्याचे समजते. तसे झाल्यास कर्मचारी मालामाल होऊ शकतात..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -