Monday, July 28, 2025
Homeराजकीय घडामोडीकिरीट सोमय्या यांना हायकोर्टाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

किरीट सोमय्या यांना हायकोर्टाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याच्या आरोप प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्‍या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली.

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार कायम असल्याने गायब झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या दारावर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचे समन्स मंगळवारी चिकटवले होते. दोघा पिता-पुत्रांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी 11 वाजता हजर होण्यास बजावले आहे.

सोमय्या पिता-पुत्रांच्या दारावर मुंबई पाेलिसांनी लावले हाेते समन्स
आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार कायम असल्याने गायब झालेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या दारावर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचे समन्स मंगळवारी चिकटवले होते. दोघा पिता-पुत्रांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी 11 वाजता हजर होण्यास बजावले आहे.

विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली निधी गोळा करून अपहार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यापासून सोमय्या पिता-पुत्र ‘नॉट रिचेबल’ आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळ्यातील रक्कम अधिक असल्याने मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला आहे.

या प्रकरणी सत्र न्यायालयाने किरीट सोमय्या यांच्या पाठोपाठ नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने मंगळवारी सोमय्यांचे मुलुंडमधील निवास्थान आणि कार्यालय गाठले. अटकेची टांगती तलवार असल्याने सोमय्या पिता-पुत्र घरी नव्हते. अखेर पोलिसांनी हे समन्सचे पत्र सोमय्या यांच्या घराच्या दरवाजावर चिकटवले. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या कार्यालयाची झडतीसुद्धा घेतली व काही कागदपत्रांची तपासणी करत उपस्थित कर्मचार्‍यांची चौकशी केली हाेती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -