ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधला सर्वात यशस्वी संघ आहे. या टीमने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. अशी कामगिरी अजून दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. पण यंदाच्या सीजनमधला मुंबईचा खेळ पाहिला की, हाच तो संघ का? असा प्रश्न पडतो. एकापाठोपाठ एक मुंबई इंडियन्सला पाच पराभवांना सामोर जावं लागलं आहे. आज पंजाब किंग्सने (Punjab kings) मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावांच करता
आल्या .