गुड फ्रायडे हा दिवस ख्रिश्चन धर्मातील लोकांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. गुड फ्रायडे हा दिवस ईस्टरच्या आधी येणाऱ्या शुक्रवारी असतो. या दिवसाला फक्त गुड फ्रायडे असे म्हटले जात नाही तर ब्लॅक फ्रायडे, ग्रेट फ्रायडे या नावाने देखील हा दिवस ओळखला जातो. या वर्षी गुड फ्रायडे हा दिवस 15 एप्रिल म्हणजे आज आला आहे. तर 17 एप्रिल रोजी ईस्टर संडे असणार आहे.
ख्रिश्चन धर्मानुसार, गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आले होते. या दिवसाचीच आठवण म्हणून ख्रिश्चन धर्मामध्ये गुड फ्रायडे हा दिवश शोक दिवस म्हणून साजरा केला जातो. गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिश्चन धर्मामध्ये कोणताही आनंददायी कार्यक्रम साजरा करण्यात येत नाही. या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोकं काळी कपडे घालून चर्चमध्ये जातात आणि येशुने केलेल्या बलिदानाबद्दल प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करतात.
गुड फ्रायडेच्या दिवशी जगभरातील चर्चमध्ये प्रार्थनांचे आयोजन केले जाते. या दिवशी आपण केलेल्या गुन्ह्यांची माफी येशुकडे मागितली जाते. हा दिवस येशुच्या बलिदानाचा दिवस असल्यामुळे या दिवशी चर्चमध्ये कोणताही घंटानाद केला जात नाही. त्याचप्रमाणे रोमन समाजातील ख्रिश्चन लोकं यादिवशी कडक उपवास देखील पकडतात.
भारतामध्ये गुड फ्रायडेच्या निमित्ताने अनेक सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांना म्हणजेच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात येते. तर महत्वाचे म्हणजे ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये या दिवशी राष्ट्रीय दुखवट्याप्रमाणे साजरा केला जातो. गुड फ्रायडे हा दिवस येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस म्हणून साजारा केला जात असला तरी गुड फ्रायडेनंतर येणारा ईस्टर संडे येशुचा प्रकटण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात.
गुड फ्रायडे का साजरा केला जातो?, जाणून घ्या या दिवसाचे महत्व!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -