Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगएकाच कुटुंबातल्या पाच जणांच्या खूनाने सर्वत्र एकच खळबळ..!

एकाच कुटुंबातल्या पाच जणांच्या खूनाने सर्वत्र एकच खळबळ..!

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये  खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या (Murder) करण्यात आली आहे. प्रयागराजमधील खागलपूर गावातील ही घटना आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची एवढ्या निर्घृणपणे हत्या का करण्यात आलीय, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस (UP Police) त्या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्यात येत आहे. घटनास्थळावरून काही माल चोरीला गेलाय का, याचाही तपास सुरु आहे.

कुटुंबू मूळचे कौशांबीचे

प्रयागराजमधील या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राहुल तिवारी हा 42 वर्षांचा असून तो प्रीती या 38 वर्षीय पत्नीसोबत या ठिकाणी राहात होता. त्यांना माही, पीहू आणि पोहू ही तीन मुले होती. खागलपूर येथील किरायाच्या घरात हे कुटुंब राहात होते. हे कुटुंब मुळचे कौशांबी येथील रहिवासी होते.

पतीचे शव बाथरूममध्ये

प्रयागराजमधील या घटनेचे दृश्य थरारक होते. बिछाण्यावर तीन मुली आणि पत्नीचे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह पडलेले होते. तर पतीचा मृतदेह बाथरुममध्ये दिसून आला. पत्नी आणि मुलींच्या शरीरावर जखमा होत्या, मात्र पतीच्या शरीरावर मारहाणीच्या काही जखमा नव्हत्या. मात्र त्याच्या हाताला आणि कपड्यांना रक्ताचे डाग दिसून आले. पोलीस (up police) या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पाच महिन्यांपूर्वी असाच खून

प्रयागराजमध्ये पाच महिन्यांपूर्वी एका कुटुंबातील चौघांचा अशाच प्रकारे कुऱ्हाडीने गळा कापून खून करण्यात आला होता. यात पती पत्नी आणि मुलगा आणि मुलीचा समावेश होता. फाफामऊ पोलीस ठाणे परिसरातील मोहनगंज फुलवरिया येथे ही घटना घडली होती. त्या घटनेतही आई आणि मुलीचे कपडे अस्तव्यस्त आणि फाटलेले दिसून आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -