ताजी बातमी ऑनलाईन टीम
साउथ सुपरस्टार यशच्या (South superstar Yash) केजीएफ 2 ने जगभरातील सिनेमागृहांमध्ये धूमाकूळ घातला आहे. रिलीजनंतर अवघ्या चार दिवसांतच केजीएफने विक्रमी कमाई केली आहे. सुपरस्टार यशसह संजय दत्त (Sanjay Dutt), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि श्रीनिधी शेट्टी (Srinidhi Shetty) स्टारर चित्रपट ‘केजीएफ 2’ (KGF Chapter 2) चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये विक्रमी कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांतच जगभरात 500 कोटी रुपयांच्या (KGF-2 500 Crore) कमाईचा टप्पा ओलांडला आहे. ‘KGF 2’ने कलेक्शनच्या बाबतीत सुपरहिट ठरलेल्या ‘आरआरआर’ला (RRR) देखील मागे टाकले आहे. थिएटरमध्येही RRR ची लोकप्रियता कमी होत आहे. काही दिवसांपूर्वी RRR ने 1000 कोटींच्या कलेक्शनचा टप्पा पार केला आहे. मात्र KGF 2 चा कलेक्शनचा वेग पाहता या चित्रपटाला हा आकडा स्पर्श करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
ट्रेड अॅनलिस्ट मनोबाला विजयबालन यांनी KGF 2 च्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे शेअर करताना चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांत 552 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती दिली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 167.37 कोटी, दुसऱ्या दिवशी 139.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 115.08 कोटी आणि चौथ्या दिवशी 132.13 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 551.83 कोटी रुपयांचे वर्ल्ड वाइड कलेक्शन केले आहे. इतकंच नाही तर मनोबाला विजयबालननुसार या चित्रपटाने सध्या जागतिक बॉक्स ऑफिसवर दुसरे स्थान मिळवले आहे.
KGF’च्या दिग्दर्शकाकडून यशचे कौतुक
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ‘KGF’ फ्रँचायझीला नवीन उंचीवर नेल्याबद्दल सुपरस्टार यशचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की यश हा एकमेव व्यक्ती आहे ज्याच्याकडे चित्रपटाचे यश पाहण्याची दृष्टी आहे. तो असा अभिनेता आहे ज्याने त्याच्या रॉकी या पात्रामुळे प्रचंड क्रेज निर्माण केली आहे. दिग्दर्शक प्रशांत नील म्हणाले की ‘केजीएफ’चा आठ वर्षांचा दीर्घ प्रवास होता. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि त्यामुळेच चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत झाली. चित्रपट निर्माते म्हणाले की “सुरुवात केली तेव्हा आम्ही आज जिथे आहोत तिथे आम्ही असू असे कधीच वाटले नव्हते.