Tuesday, December 24, 2024
Homeतंत्रज्ञानWhatsApp च्या 'या' फिचरसाठी आता मोजावे लागणार पैसे !

WhatsApp च्या ‘या’ फिचरसाठी आता मोजावे लागणार पैसे !

WhatsApp आपल्या यूजर्स साठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स जोडत असते. अलीकडेच व्हॉट्सअॅपवर मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर जोडण्यात आले आहे. आता व्हाट्सअँप या फिचरचा विस्तार करण्याची योजना आखत असून यानंतर व्हाट्सअँप यूजर्स चारपेक्षा जास्त डिव्हाइसवर एकच खाते वापरू शकतील. सध्या एकाच वेळी टॅबलेट, संगणक/लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर एकच अकॉउंट आपण ओपन करू शकतो . तुम्ही आत्तापर्यंत दोन स्मार्टफोनवर एकच अकाऊंट वापरू शकत नव्हता .

WAbetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअप सबस्क्रिप्शन- आधारित प्लॅनवर काम करत आहे, जो विशेषत: Business Whatsapp यूजर्स साठी असेल. अॅप डिव्हाइसेस लिंक करण्यासाठी एक नवीन इंटरफेस तयार करत आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप सुधारित इंटरफेसमध्ये मल्टी-डिव्हाइस सपोर्टसाठी पूर्णपणे वेगळे डिस्क्रिप्शन वापरत आहे. यानुसार, व्हाट्सअप यूजर्स एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर आपले अकाऊंट काढू शकतात. ज्याच्या मदतीने विविध लोक एकाच वेळी Business Whatsapp च्या माध्यमातून ग्राहकांशी बोलू शकतात.

Wabetainfo च्या मते, सबस्क्रिप्शन प्लॅन WhatsApp business अकॉउंटसाठी असतील आणि सबस्क्रिप्शन घेतलेल्या यूजर्सना अतिरिक्त फीचर्स मीळतील. परंतु हे फीचर्स विनामूल्य उपलब्ध होणार नाही. याशिवाय युजर्सना सबस्क्रिप्शनमध्ये इतर फीचर्स देखील मिळतील, मात्र त्यांची माहिती सध्या उपलब्ध नाही. व्हॉट्सअॅप सबस्क्रिप्शन प्लॅनसह आले तरीही हे फीचर्स घेतलेच पाहिजे अशी कोणतीही सक्ती नसेल. सबस्क्रिप्शन योजना पूर्णपणे ऐच्छिक असेल आणि यामुळे काही अतिरिक्त फीचर्स bussiness account वर उपलब्ध असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -