भारतीय क्रिकेट टीमचा माजी क्रिकेटर वेगवान गोलंदाज एस श्रीसंत चित्रपटात अभिनय करण्यासाठी तयार आहे. तो विजय सेतुपती, नयनतारा आणि सामंथा यांच्या starrer ‘Kaathuvaakula Rendu Kaadhal’ या चित्रपटात कॅमिओ रोल करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विग्नेश शिवन करत आहेत. या चित्रपटात श्रीसंत सामंथाच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची (S Sreesanth) या चित्रपटात मोहम्मद मोबी नावाची भूमिका आहे.
बहुप्रतीक्षित फ्लिक ‘काथुवाकुला रेंडू काधल’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सामंथा आणि विजय सेतुपती यांचे ‘दिप्पम दप्पम’ हे नवे ट्रॅक जारी केले आहे. या गाण्यातच श्रीसंत चित्रपटात सामंथाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.
‘दीपम दप्पम’ या शीर्षकाच्या गाण्यात खतिजा (सामंथा) आणि रॅम्बो (विजय) यांची प्रेमकथा आहे. हे गाणे अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीतबद्ध केले असून विघ्नेश शिवन यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.
विघ्नेश शिवनच्या राऊडी पिक्चर्सच्या सहकार्याने सेव्हन स्क्रीन स्टुडिओने हा चित्रपट बनवला आहे. विजय सेतुपतीने याआधी समंथा आणि नयनतारा या दोघींसोबतही काम केले आहे. या दोन्ही अभिनेत्री चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट २८ एप्रिलला रिलीज होणार आहे.