राज्यात सध्या मे महिना म्हणजेच लग्नसराईचा महिना म्हणून ओळखला जातो. लग्नसराईचा काळ सुरु झाला असून तुम्हाला जर सोन्या-चांदीची खरेदी करायची असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. मागचे काही आठवडे पाहता सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 52,370 रुपये आहे. कालच्या दिवशीही त्याची किंमत 52,860 रुपये होती. हे दर ऑनलाईन आहेत. तुम्हाला तुमच्या शहरातील अचूक दर पाहायचे असतील तर तुम्ही स्थानिक ज्वेलर्सला भेट देऊन माहीत करून घेऊ शकता.-
याशिवाय आज 29 एप्रिलला देखील देशात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 48,000 आहे, काल ही किंमत 48,450 रुपये होती. म्हणजेच सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम जवळपास 450 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी आहे.
चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर चांदीचे दर मोठ्या वेगाने कमी झाले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 63,800 असून हाच दर काल 65,000 रुपये होता. म्हणजेच चांदीच्या दरात प्रतिकिलो तब्बल 1200 रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आलं.